न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती लोकांच्या हक्कांचे राखणदार असले, तरी त्यांचं रक्षण फक्त त्यांची सद्सद्विवेकबुद्धी व सचोटी याच दोन बाबी करू शकतात!

कर्णाला कवचकुंडलं होती, तशीच ती सद्सद्विवेकबुद्धी व सचोटीची कवचकुंडलं न्यायाधीशाला/न्यायमूर्तीला मिळतात. ती असेपर्यंत तो/ती कायमच अभेद्य असतात. न्यायसंस्थेवर, न्यायाधीशावर शिंतोडे उडवले जातात, त्याचं/तिचं चारित्र्यहनन केलं जातं. तेव्हा ते नि:शस्त्र असतात. सोशल मीडिया, लोक किंवा माध्यमं, यांच्याशी त्यांना कायद्यानंच लढावं लागतं. न्यायालयीन मूल्यांनी त्यांचं तोंड बंद केलेलं असतं व हात बांधलेले असतात.......